Skip to content

२०२२ मध्ये भारतासाठी फ्रेंच सुवर्णसंधी

फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनैन काल जाहीर केल्याप्रमाणे फ्रान्स आता युरोपियन राष्ट्रसंघाचा पुढच्या सहा महिन्यांसाठी अध्यक्ष झालेला आहे. ह्यामधे महत्वाची बाब म्हणजे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये युरोपियन राष्टसंघाला आणि भारताला एकमेकांचे व्यापारासाठी नैसर्गिक भागीदार बनविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे असे सांगितले. 

भारत आणि फ्रान्स मित्र देश असून दोहनी देशांचा धोरणात्मक करार १९९८ मध्ये झाला होता. ह्यामध्ये संरक्षण, अंतराळ, आणि अणुऊर्जा सहकार्य अशासारख्या संदर्भात द्विपक्षीय करार झाला होता. दोहनी देश कायम हे संबंध उत्तमोत्तम कसे होतील ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हे २०१८ मध्ये भारताला भेट द्यायला आले होते. तसेच भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन वेळा २०१५ आणि २०१७ मध्ये फ्रान्सच्या दौरा करून आले आहेत.

फ्रान्सने भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यपद मिळवण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला आहे. हे चीनच्या दृष्टीस पडले नसेल तरच आश्चर्य. फ्रान्स आता भारताच्या मदतीने इंडो-पॅसिफिक प्रदेशामध्ये सक्रिय होण्याची इच्छा बाळगून आहे. म्हणूनच मागील वर्षी भारताने आणि फ्रान्सच्या नौदलाने जोमाने संयुक्त सराव करायला सुरुवात केली आहे. आता हे सहकार्य अजून वाढणार आहे कारण फ्रेंच कंपन्या भारतात येऊन संरक्षणासाठीच्या उपयुक्त इंजिने तयार करणार आहेत. ह्याने सहविकास होणार असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांच्या फ्रान्सच्या भेटीवरून परत आल्यावर केले.

दोहनी देश हे संबंध आर्थिक, शैक्षणिक, आणि सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यासाठी कार्यशील आहेत.

आर्थिकदृष्ट्या सहकार्यासाठी ७ कार्यरत गट मंत्रालयात आहेत, जे द्विपक्षीय करारातून स्थापन केलेले आहेत. हे गट माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार, रस्ते, शहर विकास, शेती व अन्न प्रक्रिया, ऊर्जा, खनिजे अन्वेषण, आणि, पोस्ट ह्या विषयांवर चर्चा व कामे करतात.

२०२० मध्ये भारत आणि फ्रान्सचा द्विपक्षीय व्यापार हा ९.०४ बिलियन युरोंचा झाला होता. तोच फेब्रुवारी २०२१ मध्ये ८१४.३५ मिलियन युरोंचा झाला होता. भारतामध्ये गुंटकवणूक करणाऱ्या देशांमध्ये फ्रान्स हा अकराव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत एकत्रित २००० ते २०२१ ची एकूण गुंतवणूक हि ९.८३ बिलियन अमेरिकी डॉलर एवढी आहे.

जेव्हा २०१८ मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी आपला भारत दौरा सुरु केला तेव्हा राष्ट्रपती भवनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना मॅक्रोन म्हणाले, “दोन्ही देशांच्या सहसंबंधाचे नवे युग आम्हाला सुरु करायचे आहे, भारत फ्रान्सचा नेहमीच पहिल्या क्रमांकाचा सहकारी मित्र राहिला आहे. या प्रदेशात ( भारतीय उपखंड आणि आशिया) आमच्यासाठी भारत हे प्रवेश करण्याचे स्थान आहे तसेच  फ्रान्स हा भारतासाठी युरोपात प्रवेश करण्यासाठी द्वार म्हणून ओळखला जावा अशी आमची इच्छा आहे”. 

अश्या एकूण सकारत्मक संबंधामध्ये फ्रान्सचे फ्रान्सचे युरोपियन राष्ट्रसंघाचे अध्यक्ष होणं हि भारतासाठी आर्थिकदृष्टया सुवर्णसंधी आहे. 

भारत व युरोपियन राष्ट्रसंघाने २०२१ मध्ये बंद पडलेली व्यापार संबंधात कराराची बोलणी परत सुरु केली. ह्या बोलण्यांमधून अजून काही अंतिम निष्कर्ष निघालेला नाही. आर्थिकदृष्टया फायदेशीर असणाऱ्या ह्या व्यापाराच्या करारासाठी भारत फ्रान्सच्या मदतीने ठोस पावले उचलू शकेल. फ्रान्सने आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षाने आधीच व्यक्त केलेल्या इच्छेनुसार भारताबरोबर संबंध वाढवण्यासाठी ते उसुक आहेत. दोहनी देशांमध्ये वर्षानुवर्ष असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना विकासासाठी अजून उच्च स्तरावर नेण्याची हि निश्तिच एक सुवर्णसंधी आहे.

माहितीचे स्रोत:

भारत आणि फ्रान्स, परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार.

Published inSunday Writes

2 Comments

  1. My spouse and I stumbled over here from a different web address and thought I might as well check things out. I like what I see so now i’m following you. Look forward to exploring your web page again.

  2. I discovered your blog site on google and check a few of your early posts. Continue to keep up the very good operate. I just additional up your RSS feed to my MSN News Reader. Seeking forward to reading more from you later on!…

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!